भारती पवार यांच्या पराभवाला जबाबदार असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी राजीनामे द्यावे….?
भारती पवार यांच्या पराभवाला जबाबदार असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी राजीनामे द्यावे….?
मनमाड(प्रतिनिधी):- नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाहिजे तशी कामगिरी केली नाही मुळात महाराष्ट्रात तर अपेक्षेपेक्षा सुमार कामगिरी केली याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्याची तयारी करत आहेत तशी मागणी त्यांनी दिल्लीत हायकामांडकडे केली आहे याचं पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या पराभवाला जबाबदार असणाऱ्या भाजपा सह मित्रपक्षांच्या नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावे अशी मागणी भाजपचे काही कार्यकर्ते खाजगीत बोलून दाखवत आहेत तर भाजपचा अंतर्गत कलह देखील भारती पवार यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे मत अनेकांनी बोलून दाखवले आहे.
भाजाप तर्फे डॉ भारती पवार यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या उमेदवारी बाबत निगेटिव्ह मेसेज पसरवला होता.याचा फटका भाजपला आपली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा गमावून चुकवावा लागला मुळात भारती पवार यांच्या पराभवाला अनेक कारणे आहेत यात मुख्य कारण म्हणजे भाजपाचा वाढलेला अतिआत्मविश्वास भाजपचे मनमाड शहरात तसेच नांदगाव तालुक्यात अनेक जिल्ह्याचे पदे असलेले नेते आहेत मात्र ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांनी कामच केले नाही व ज्यांचा काहीच प्रभाव नाही त्यांनी फक्त काम करण्याची ऍक्टिग केली या सगळ्या गोष्टींमुळे भारती पवार यांना पराभव स्वीकारावा लागला राज्यात भाजपाला आलेलं अपयशाची जबाबदारी घेऊन थेट राजीनामा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार झाले आहेत मग मनमाड व नांदगाव तालुक्यातील नेते का ही आपली नैतिक जबाबदारी स्वीकार करून राजीनामे देत नाही असा सवाल भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.आता यावर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करून या स्वयंघोषित नेत्यांची हकालपट्टी करावी असाही सवाल भाजपच्या एका गटाकडून विचारला जात आहे.