दिंडोरीत भास्कर भगरे ठरले जायंट किलर ; केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांना धोबीपछाड


दिंडोरीत भास्कर भगरे ठरले जायंट किलर ; केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांना धोबीपछाड

मनमाड(आमिन शेख):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असूनही गेल्या वीस वर्षांपासून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण तीन टर्म व भारती पवार एक टर्म यांच्या रूपाने भाजपाच्या ताब्यात असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदा काबीज करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष व महाविकास आघाडीला यश आले असुन विद्यमान केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांना तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांनी धोबीपछाड देत भास्कर भगरे सर जायंट किलर ठरले आहेत त्यांच्या विजयाची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या विजयाची आणि परिवर्तनाची चर्चा सुरू होती व ती आज सत्यात उतरली आहे.आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा परिवर्तन झाले असुन गेल्या 20 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी खेचून आणला असुन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आशा चुरशीच्या लढतीत भास्कर भगरे यांनी तब्बल एक लाखा पेक्षा जास्त मतांनी पराभव करून खेचून आणला आहे.भगरे हे जॉइंट किलर ठरले आहेत.लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच डॉ भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती विरोधकांपेक्षा स्वपक्षीय भाजापातुनच त्यांना मोठा विरोध होता मनमाड सारख्या शहरात भाजपमध्ये गटातटाचे राजकारण बघायला मिळत होते यात भाजपचे प्रमुख नेते डॉ भारती पवार यांच्या उमेदवारीमुळे नाराज होते याला कारण म्हणजे केंद्रीय आरोग्यराजमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष तर दुसरीकडे त्यांच्या पीए संस्कृतीने नागरिकांच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष यासह शेतकऱ्यांची कांदा निर्यात बाबतीत असलेली नाराजी तर दुसरीकडे रेल्वेच्या माध्यमातून नाराज असलेला कामगार वर्ग केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगार युवक महागाईच्या विळख्यात अडकलेल्या महिला यासह आरोग्याच्या दृष्टीने असलेले अनेक प्रश्न या सगळ्याचा फटका विद्यमान केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांना बसला आहे.लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवीन चेहरा असलेले भास्कर भगरे सर यांच्याकडून त्यांना कडवे आवाहन देण्यात आले भाजपा सुरवातीपासूनच दोन ते अडीच लाख मतांनी आम्ही निवडून येऊ आशा वलग्ना करत होते मात्र प्रत्यक्षात भाजपचा दारुण पराभव झालेला आहे भास्कर भगरे हे नवखे उमेदवार जॉइंट किलर ठरले असुन त्यांनी डॉ भारती पवार यांचा तब्बल एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला आहे.महायुतीच्या वतीन विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी टाईट फिल्डिंग लावली होती आणि त्यांनी एकट्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळवून दिले बाकी सर्व ठिकाणी भाजपला धोबीपछाड मिळाला आहे.तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी नेतृत्व केले व तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भास्कर भगरे यांना प्रमोट करत विजयश्री खेचून आणला.

Advertisement

दुसऱ्या भगरेनी घेतले लाखापेक्षा जास्त मत…!
भाजपाच्या वतीने मतांची विभागणी व्हावी म्हणून अनेक खेळया खेळण्यात आल्या यात सर्वात महत्वाची म्हणजे भास्कर भगरे यांच्या नावशी साधर्म्य असलेले बाबू सदू भगरे सर नावाचा गृहस्थ उभा करण्यात आला योगायोग असा की दोन भगरे नावाचे व्यक्ती मतदान मशिनमध्ये असल्याने ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी दुसऱ्या भगरे यांना मतदान केले परिणामी बाबु भगरे यांना एक लाखा पेक्षा जास्त मत मिळाली यामुळे भास्कर भगरे यांचा लीड मोठ्याप्रमाणात कमी झाला अन्यथा भास्कर भगरे हे किमान दोन ते अडीच लाख मताधिक्याने निवडून आले असते.

महायुतीच्या वतीने वंचीत बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन…
महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचा सुरवातीपासूनच जोर होता नांदगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे आहेत लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही कांदे यांच्यावर होती मात्र जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा पराभव दिसायला लागल्याने मतांची विभागणी व्हावी या उदेशांने महाविकास आघाडी तर्फे दलित मुस्लिम मतदारसंघात तुम्ही भाजपला मत नाही देत ना मग किमान वंचीत बहुजन आघाडीला तरी मतदान करा असे आवाहन केले व हे करतांना शिंदे गटाचे अनेक नेते मनमाड शहर व तालुक्यात बघायला मिळाले.

फोटो कप्शन
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जॉइंट किलर ठरलेले भास्कर भगरे निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे व इतर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!