खोटारड्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात मनमाड पालिकेवर हंडा मोर्चा काढणार : खालिद शेख
खोटारड्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात मनमाड पालिकेवर हंडा मोर्चा काढणार : खालिद शेख
मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहराला 18 दिवसांआड पाणी देतो असे सांगून तब्बल 25 उलटुन गेले तरी पाणी आले नाही पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी हे खोटं बोलतात जनतेची दिशाभूल करतात या खोटारड्या मुख्याधिकारी विरोधात पालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेना उपशहर प्रमुख खालिद शेख यांनी दिली आहे.
प्रभाग क्र.2 सिकंदर नगर,डॉ. आंबेडकर नगर,गौसीया नगर, बुरकुलवाडी या भागात पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे पाणी बाणी चे संकट आले आहे याची कोणी दखल घेत नसून स्थानिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे मात्र विकत पाणी मिळण्यासाठी देखील अनेक अडचणी आहेत हा सर्व प्रकार पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यामुळे होत आहे अठरा दिवसांनी पाणी देण्याच्या वलग्ना करणारे 25 दिवसांनी देखील पाणी देत नाही यामुळे आम्ही पालिकेच्या विरोधात हंडा मोर्चा काढणार असल्याचे शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालिद शेख यांनी सांगितले आहे.