शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला विरोध
मनमाड(अजहर शेख):- महाराष्ट्र राज्यात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे जिल्हाधिकारी यांना मंडळ अधिकारी सोपान गुळवे व तलाठी सागर जोपुळे यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले
कारखाना शाखेचे सचिव प्रविण अहिरे, कारखाना शाखेचे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष किरण आहीरे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव सागर गरूड, सुनिल सोनवणे, सचिन इंगळे, पंढरीनाथ पठारे व अर्जुन बागुल आदी च्या निवेदनावर सह्या आहेत.सदर निवेदनात म्हटले आहे अवघ्या जगाला हेवा वाटावा अशी भारतीय लोकशाही आपल्या देशात नांदते आणि तीच लोकशाही आपल्या विविधतेने नटलेल्या देशाला एकसंध ठेवत आली आहे आणि यासाठी देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत जी शिक्षण पद्धतीने रचलेला पाया हा भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांना सर्वसमावेशक सिद्ध करत आला आहे महाराष्ट्रात शालेय शिक्षणातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात ‘मनुस्मृतीचा’ काही भाग समिलीत केला जाणार आहे देशभरात केंद्र सरकारने यावर्षीपासून शालेय आणि उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) लागू केलं आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा एससीईआरटीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आणि त्यासाठी 3 जूनपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखड्यात पान क्रमांक ८४ वरती मूल्य आणि स्वभाववृत्ती या अंतर्गत ‘मनुस्मृती’चा संदर्भ देत एका श्लोकाचा उल्लेख करण्यात आला आहे.अशा प्रकारचे विषमतावादी साहित्य, भाषा किंवा संदर्भ भारतीय लोकशाहीला धरून नाहीत. आपला देश एक धर्मनिरपेक्ष देश आहे. सरकारने आराखड्यात केवळ संदर्भ घेतला असला तरी अप्रत्यक्षरित्या तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून मनुस्मृतीचा प्रचार करत आहेत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय.”मनुस्मृतीने जातीची उतरंड घट्ट केली. स्त्रिया आणि शूद्रांना समानतेचे सर्व हक्क सपशेल नाकारले. याउलट भारताच्या संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले.”भारताचे शिक्षण संविधानानुसार चालले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राने मनुस्मृतीला केव्हाच जाळून टाकले आहे. शिक्षणाची पावले उलट्या दिशेने पडू दिली जाणार नाहीत.”या निवेदनानुसार आम्ही ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन आमची एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपणास विनंती करतो की कोणत्याही प्रकारच्या विषमतावादी साहित्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणे हा भारतीय संविधानाचा अपमान राहील
तरीही विषमतावादी साहित्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
यावेळी फुले -शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख, रिपाइं नेते दिनकर कांबळे, असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव प्रवीण आहिरे, खजिनदार संदिप धिवर, अतिरिक्त सचिव सागर गरूड, सचिन इंगळे, सुनिल सोनवणे, पंढरीनाथ पठारे, सुमित आहिरे, ओमकार ठोंबरे तुषार रनधिर सूनिल साळुंखे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.