आमदार कांदे यांच्या हस्ते युनियन बँकेच्या ग्राहकांना पैसे परत देण्याची सुरवात
आमदार कांदे यांच्या हस्ते युनियन बँकेच्या ग्राहकांना पैसे परत देण्याची सुरवात
मनमाड(अजहर शेख):- मनमाड युनियन बँकेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मनमाड शहर व परिसरातील शेकडो नागरिक व शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते, आणि तो घोटाळा आहे असे समजल्यावर सर्वच नागरिक व शेतकरी बांधव हवालदिल झाले आणि त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांनी धाव घेत सर्वांना धीर दिला आणि बँक प्रशासनाला धारेवर धरले इतकेच नाही तर स्वतः फिर्यादी होऊन बँकेच्या सर्वच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला, मुख्यमंत्री महोदयांना सर्व विषय सांगितला मुख्यमंत्री साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून प्रकरणाची दखल घ्यायला सांगितले, आमदार कांदे स्वतः पुणे येथे जाऊन बँकेच्या वरिष्ठांशी भेट घेतली, बँकेने त्यांच्या वरिष्ठांना मनमाड येथे पाठवले आणि आज याचे फलित म्हणजे ज्या ज्या ग्राहकांचे पैसे अडकलेले आहेत त्यांचे सर्व प्रकरण निकाली लागण्याचे आश्वासन देत आज सात ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आले.
अत्यंत कमी कालावधीत शेकडो कोटी रुपयांचा मोठा घोटाळा आमदार सुहास कांदे यांच्या दमदार स्टाईल मुळे चार दिवसात विस्तारला गेला याचा सर्व बँकेचे ग्राहक नागरिक व शेतकरी बांधवांना आनंद झाला. उपस्थित सर्व ग्राहकांनी आमदार सुहास कांदे यांच्या आभार मानले. पैसे मिळणार की नाही या आशेवर असताना आमदार कांदेनी अतिशय जबाबदारपणे भूमिका निभावली आणि आज सर्व ग्राहकांचे पैसे परत देण्याची सुरुवात झाली आहे याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होता.याप्रसंगी सुहास कांदे युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, भाजपा उपजिल्हा अध्यक्ष नितीन पांडे, आरपीआय ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहिरे, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, गंगादादा त्रिभवन, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाट, आमीन पटेल, पिंटू वाघ, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले आसिफ शेख, लाला नागरे,दिनेश घुगे, ललित रसाळ, बाबा पठाण, आसिफ शेख, प्रशांत दराडे, प्रमोद अहिरे, गुरू निकाले, सचिन दरगुडे, कुणाल विजापूरकर, निलेश व्यवहारे उपस्थित होते.