लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न


लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

Advertisement

मनमाड (अजहर शेख) :- येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत मतदान जनजागृती राष्ट्रीय अभियानातंर्गत बैठक व डिजीटल बोर्ड अनावरण कार्यक्रम साईप्रसन्न लॉन्स, लोकनेते तुकाराम पाटील नगर, चांदवड रोड, मनमाड येथे संस्थेचे अध्यक्ष यशोदिप पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ करीता मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करून जनतेमध्ये भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन संस्थेचे खजिनदार श्रीमती अलकाताई पाटील शिंदे यांनी केले. सदर बैठकीमध्ये समीर शेख, सुरेंद्र राजपुरोहित, विलास चव्हाण, प्रभाकर जाधव, निलेश गुरव, अतुल इप्पर, शुभम वाघ, रोहित राऊत, इम्तियाज शेख, गणेश पगारे, जावेद खान, बाजीराव शिरसाठ, सन्त्री पवार, सचिन शेलार, किरण पगार, अरुण गायकवाड, संदिप कोरडे, ज्ञानेश्वर पवार, शुभम जेजुरे, वाल्मिक उंबरे, विजय इप्पर आदी मान्यवर तसेच शहरातील सुशिक्षित तरुण व सूज्ञ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सौ. साक्षीताई सुनिल कडासने व मुख्य लिपीक अमित चार्वेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!