शून्यातून विश्व निर्माण करणारा भूमिअभिलेखचा मुश्ताक……!
शून्यातून विश्व निर्माण करणारा भूमिअभिलेखचा मुश्ताक… …!
मनमाड (आमिन शेख):- एखाद्या व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रात यश मिळाले म्हणजे ते त्याच्या कर्तृत्व आणि मेहनतीने मिळते ते मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला अनेक खस्ता खाव्या लागतात अस म्हणतात जिद्द असेल तर सगळं साध्य करता येते असाच काहीसा जिद्द असलेला मनमाड येथील तरुण मुश्ताक शेख आहे ज्याने शरीर सौष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर नाव तर कमावले व त्याच जोरारावर तो आता भुमीअभिलेख येथे नोकरी करत असुन नोकरी सांभाळून तो सध्या भूमिअभिलेख खात्याकडून देशपातळीवर शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःचे व भूमिअभिलेख खात्याचे नावलौकिक करत आहे.आजच्या यशोगाथामध्ये बघुया मुश्ताक शेख याचा शून्यातून जग निर्माण करणारा व थक्क करणारा प्रवास….
मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याने काहीतरी असे करावे जेणेकरून त्याचे नाव कायमस्वरूपी स्मरणात राहील ते म्हणतात
पुत्र व्हावा ऐसा गुंडा..! त्याचा तीही लोकी झेंडा..! याच ओळीप्रमाणे मुश्ताक शेखची यशाची गोष्ट सुरू झाली लहान असताना व्यायाम करण्याची भलती आवड असल्याने मुश्ताक कायम व्यायाम शाळेच्या भोवताली असायचा तिथे व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या शरीरसौष्ठव पटूंना बघून आपणही एक दिवस काही तरी करून दाखवू असे मनात विचार करून तिथेच भटकंती करायचा व्यायाम करायचा मात्र घरची परिस्थिती बेताची यामुळे व्यायाम केला तरी त्यासाठी लागणारा खुराक आणायचा कुठुन हा प्रश्न आ वासून उभा होता.मग त्याच व्यायाम शाळेत येणाऱ्या शरीरसौष्ठव पटूंची काम करायची डबेल्स प्लेट यासह व्यायामासाठी लागणारे साहित्य देण्यात मुश्ताक व्यस्त रहायला लागला यातच तत्कालीन प्रसिध्द असलेला शरीरसौष्ठव गोपाळ गायकवाड यांची नजर मुश्ताकवर पडली त्यांनी त्याची आस्थेने विचारपूस करत मी तुला तयार करतो फक्त तु मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले मग काय इथुनच मुश्ताकच्या यशाला सुरुवात झाली तो काळ होता सण 99 ते 2000 चा यानंतर मुश्ताकने मागे वळून बघितले नाही. मग काय रोज गोपाळ गायकवाड यांच्याकडून व्यायामाचे धडे गिरवत मुश्ताक एक चांगला शरीरसौष्ठव झाला त्याच्यात असलेली जिद्दही त्याला काम आली मग प्रथम मनमाड श्री हा किताब मिळवत त्याने यश संपादन केले.सण 2002 ला उत्तर महाराष्ट्र श्री हा किताब मिळवून मुश्ताकने इतिहास रचला यानंतर त्याने मागे वळुन बघितलेच नाही.यानंतर 2005 मध्ये नाशिक श्री व त्याच वेळी झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवले यानंतर सोलापूर पुणे मुंबई औरंगाबाद नांदेड नागपूर यासह राज्यातील अनेक ठिकाणी अनेक स्पर्धेत प्रथम ते तृतीय पारितोषिक मिळवले अनेकदा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मानाचा असलेला किताब मिळवला 2018 साली तर दिल्ली येथे पार पडलेल्या मिस्टर एशिया स्पर्धेत 4 था क्रमांक मिळवत महाराष्ट्रसह नाशिक जिल्हा व मनमाड शहराचे नावलौकिक केले.त्यानंतर 2022 ला कोलकत्ता येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत चमकदार कामगिरी केली 2022 व 23 असे सलग 2 वेळेस नाशिक मास्टर श्री हा किताब देखील मुश्ताकने आपल्या नावे केला.सध्या मुश्ताक हा नॅशनल मास्टर श्री या स्पर्धेची तयारी करत असुन आर्थिक अडचणीमुळे माझ्या सारख्या अनेकांना आपल्या स्वप्नावर पाणी फेरावे लागते सध्या मुश्ताक हा नांदगाव येथील भूमिअभिलेख कार्यलयात कार्यरत असुन रोज आपली नोकरी करुन तो शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तयारी करत आहे.तसेच अनेक तरुणांना देखील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी तयार करून घेत आहे.
राज्यातील अशा अनेक मुश्ताक सारख्या तरूणांना योग्य मार्गदर्शन तसेच आर्थिक मदतीची गरज असुन त्यांना योग्य मदत मिळाली तर ते जिल्ह्यासह राज्याचे नावलौकिक करतील यात शंका नाही. मुश्ताकने जे करून दाखवले ते करण्यासाठी स्वतःच्या मनाची आणि जिद्द असण्याची देखील गरज आहे.सध्या कार्यरत असलेल्या भूमिअभिलेख कार्यलयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील मुश्ताकच्या कार्याची दखल घेऊन त्याला शासकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावे भविष्यात असे अनेक होतकरू आणि गरजू तरुणांना संधी मिळेल.
तरुणांनी शरीर सौष्ठव स्पर्धेकडे वळावे….!इंग्रजीमध्ये एक म्हण आहे हेल्थ इस वेल्थ अगदी याच म्हणीचा अगदी जवळून सबंध हा तरुणांसाठी आहे आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चालली असून असेच सुरू राहीले तर भारताचे भवितव्य खराब होईल यामुळे तरुणांनी शरीर सौष्ठव स्पर्धेकडे वळावे यामुळे त्यांना चांगले आरोग्य लाभेल आणि शासकीय नोकरीत देखील संधी मिळेल यामुळे तरुणांनी शरीर सौष्ठव स्पर्धेकडे वळावेमुश्ताक शेख,शरीरसौष्ठवपटू