नाशिकमध्ये भुजबळांची माघार मात्र निकटवर्तीयांचा आधार…?


नाशिकमध्ये भुजबळांची माघार मात्र निकटवर्तीयांचा आधार…?

नाशिक( मनमाड सम्राट वृत्तसेवा):- गेल्या महिनाभरापासुन नाशिकच्या जागेबाबत सुरू असलेला तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचे चित्र असतांना या निवडणुकीत भुजबळांनी माघार घेतली तरीही ही जागा जाहीर करण्यात आलेली नसल्याने तसेच भाजपचा नाशिकच्या जागेवर दावा अद्यापही कायम असल्याने वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणावर खलबते सुरू आहेत यातच आता नवीन बातमी समोर आली असुन छगन भुजबळ यांनी जरी माघार घेतली असली तरी त्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.याबाबत नाशिक जिल्ह्यात चर्चा रंगली असुन भाजपा तर्फे भुजबळ यांच्या अगदी जवळच्या निकटवर्तीयाला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहे.
            संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघात रोज नवनवीन ट्विस्ट बघायला मिळत आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपासह मित्र पक्षचा विरोध असल्याने या जागेवर अद्यापही महायुतीच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आला नाही महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर होऊन त्यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे या जागेवर विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीतुन मला उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे सांगून बरेच दिवस वातावरण तापते ठेवले मात्र अचानक त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक करून आपली उमेदवारी मागे घेतली मात्र त्यावेळी त्यांनी सांगितले समोरचा उमेदवार मतदारसंघात दोनदा फिरून आला मात्र महायुतीने अद्यापही उमेदवार दिलेला नाही याबाबतचा तिढा सुटावा या दृष्टीने मी निर्णय घेतला असल्याचे सांगितले असले तरी मात्र आज अचानक प्रसारमाध्यमातून भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्या निकटवर्तीयाला उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत यामुळे आता पुन्हा एकदा भुजबळांच्या निकटवर्तीय पैकी समीर भुजबळ की त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांना उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!