दिंडोरीला महायुतीच्या डॉ भारती पवारांच्या प्रचार शुभारंभाकडे जनतेने फिरवली पाठ…घसरली मोदींची लाट…!


दिंडोरीला महायुतीच्या डॉ भारती पवारांच्या प्रचार शुभारंभाकडे जनतेने फिरवली पाठ…घसरली मोदींची लाट…!
दिंडोरी (विशेष प्रतिनिधी):- मोदींच्या लाटेवर निवडून आलेल्या आणि पहिल्याच वेळी केंद्रीय राज्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडूनही विकास न केलेल्या महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचा दिंडोरीत प्रचार शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला यासाठी महायुतीतर्फे साम दाम दंड भेद वापरूनही  या कार्यक्रमाकडे जनतेने सपशेल पाठ फिरवल्याने प्रचार शुभारंभ रद्द करून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांचा हॉलमध्ये तात्पुरता मेळावा घेण्याची नामुष्की महायुतीच्या नेत्यांवर आली अपेक्षित असलेली गर्दी न जमल्याने हा कार्यक्रम आटोपता घेऊन डॉ भारती पवार यांनी तेथून काढता पाय घेतला व आपल्या सर्वच कार्यकर्त्यांवर फायरिंग केल्याची चर्चा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होत आहे.
            याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचाराचे नारळ शुभारंभ काल दुपारी १२ वाजता दिंडोरी शहरातील गढी गणपती मंदिरात करण्याचे आयोजन केले होते.त्यानंतर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.महायुतीच्या वतीने विशेषतः भाजपाने यासाठी साम दाम दंड भेद सर्वच पणाला लावले मात्र जनतेला ना मोदी लाट घेऊन आली ना डॉ भारती पवार यांचे कार्यकर्ते या कार्यक्रमाकडे जनतेने सपशेल पाठ फिरवली यामुळे बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन डॉ भारती पवार यांना काढता पाय घ्यावा लागला मात्र रागावलेल्या भारती पवार यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांची चांगलीच खरड पट्टी केल्याची चर्चा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होत आहे.
 प्रचार शुभारंभाचे बॅनर तसेच संदेश सोशल मीडियावर झळकले. त्याचबरोबर मित्रपक्ष व स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. परंतु, जेमतेम पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले. प्रचाराचा शुभारंभ असतानादेखील आवश्यक गर्दी जमत नसल्याने मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवाराची वाट बघत कार्यकर्त्यांना बसावे लागले. उशिराने उमेदवार मेळाव्याच्या ठिकाणी आल्या व अपेक्षित उपस्थित संख्या नसल्याने प्रचाराचे नारळ शुभारंभ पुढे ढकलण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी व्यासपीठावर महायुतीच्या उमेदवार भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, श्याम बोडके, नरेंद्र जाधव, चंद्रकांत राजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल कदम, भाजप तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे, महिला तालुकाध्यक्षा उज्ज्वला उगले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!