मनमाडच्या आंबेडकर चळवळीची वाताहत (फरफट)…


मनमाडच्या आंबेडकर चळवळीची वाताहत (फरफट)…

मनमाड:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकर चळवळीचे प्रमुख केंद्रस्थान असलेल्या मनमाड शहरात सध्या आंबेडकर चळवळीची वाताहत झालेली बघायला मिळत आहे.आंबेडकर चळवळीत जेवढे गट सक्रिय असतील त्या सर्वच गटांचे कार्यकर्ते नव्हे तर  नेते मनमाड शहरात आहेत मात्र तरीही बोटावर मोजण्या इतके नेते कसेबसे निवडून येताहेत याला मुख्य कारण म्हणजे एकमेकांना खाली ओढण्यासाठी लागलेली चढाओढ ..? मोठ्या प्रमाणावर आणि निर्णायक एस सी  मतदान असतांनाही आंबेडकर चळवळीच्या नेत्यांना इतर पक्षाच्या तिकिटावरच निवडणूक लढवावी लागते ही बाब दुर्दैवी आहे.निवडणूक लढवताना होणाऱ्या तडजोडी याचे मुख्य कारण आहे.या तडजोडी केवळ स्वतंत्रपणे व वैयक्तिक पातळीवर करण्यात येतात.यामुळे पक्ष संघटना आणि कार्यकर्ते यांची अजुन मोठ्या प्रमाणावर वाताहत होते.
              मनमाड शहरातील लोकसंख्या बघता दलित मुस्लिम मतांची संख्या प्रथम क्रमांकांवर आहे मात्र तरीही या दोन्ही समाजातील नेत्यांना कार्यकर्त्यांसह इतर पक्षाच्या दावणीला बांधुन घ्यावे लागते आज आपण फक्त आंबेडकर चळवळीचा विचार केला तर रिपब्लिकन पक्षाचे सर्वात मोठे वर्चस्व मनमाड शहरात आहे याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्यासह गंगादादा त्रिभुवन दिलीप नरवडे कैलास आहिरे दिनकर धिवर तर युवकांमध्ये गुरुकुमार निकाळे प्रमोद आहिरे शेखर आहिरे यांच्यासह इतर कार्यकर्ते करत आहेत तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यरत आहे तर वंचीत बहुजन आघाडीचे नेतृत्व आम्रपाली निकम कदीर शेख कैलास गोसावी यांच्यासह इतर जण करतात मात्र त्यांच्यात देखील गटागटातील राजकारण अवघड आहे.माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे हे सध्या कोणत्याही पक्षात नसले तरी याआधी त्यांनी रिपब्लिकन पक्ष यासह वंचीत बहुजन आघाडीचे नेतृत्व केले आहे मात्र त्यांनाही इतर पक्षापेक्ष्या स्वपक्षीय यांच्यासोबतच लढावं लागल्याचा इतिहास या मनमाड शहराने बघितला आहे.दोनवेळा थेट नगराध्यक्ष पदावर मतांची संख्या बघता त्यांचा विजय सुनिश्चित असतांना देखील याच आंबेडकर चळवळीच्या नेत्यांच्या गटबाजीने त्यांना पराभव पत्करावा लागला एकवेळ शिवसेनेचे दिलीप सोळसे यांच्यासोबत थेट निवडणूक असतांना देखील गटबाजीने त्यांना फटका बसला तर तसाच काहीसा प्रकार गणेश धात्रक यांच्या मातोश्री पद्मावती धात्रक  आणि राजेंद्र पगारे यांच्या पत्नी नगरसेविका रुपाली पगारे यांच्या थेट लढतीत झाला त्यावेळेही त्यांना गटबाजीने पराभव पत्करावा लागला.सध्या शहरात असलेले दोन्ही राजाभाऊ हे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याकडे आहेत राजेंद्र आहिरे थेट युतीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आहेत तर राजेंद्र पगारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण वेळी आपण फक्त विकासासाठी कांदे सोबत आहोत असे भाष्य केल्याने कांदेसह सर्वच राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे भविष्यात कोण कुठे असेल हे आज सांगणे योग्य नाही तर दुसरीकडे आठवले गटाचे युवक तालुकध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी देखील भाजपाचे उमेदवार डॉ भारती पवार यांचे काम करणार नसल्याचे जाहीर केले असुन आम्हाला कायम गृहीत धरून वागणूक दिली जाते आमच्या नेत्यांचे फोटो लावण्याची तुम्हाला एलर्जी असेल तर आम्हलाही तुमची एलर्जी आहे असे म्हणत त्यांनी युतीधर्म आम्हीच पाळायचा का ..? असा सवाल उपस्थित केला व आगामी काळात निकाळे काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरातील काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणारे संजय निकम रवींद्र घोडेस्वार संतोष आहिरे यांचीही स्वतःची वेगळी ताकत असतांना देखील तेही कधी पक्षाच्या मार्फत तर कधी व्ययक्तिक रित्या इतर पक्षांकडे बांधले जातात सध्या हे तिघेही आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात आहेत मनमाड शहरात वंचीत बहुजन आघाडीचा पाहिजे तसा प्रभाव पडलेला दिसत नाही राजेंद्र पगारे यांच्या वेळी तो काहीसा वाढला होता मात्र सध्या एकदमच शांतता आहे.राजेंद्र पगारे यांनी आमदारकीची निवडणूक लढली आणि त्यांच्यामुळेच मी आमदार होऊ शकलो हे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनीही भर सभेत कबूल केल्याचे अख्या तालुक्यातील जनतेने बघितले आहे.एकंदरीत काय तर शहरात सर्वात जास्त मत सर्वात जास्त ताकद असतांना देखील आंबेडकर चळवळ आणि चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर वाताहत(फरफट) झाल्याचे दिसून येते आहे. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रकाशभय्या चवरीया हे एकटेच किल्ला लढवत असुन लोकजनशक्ती पार्टी च्या माध्यमातून राजेंद्र सपकाळे व किशोर आहिरराव हे दोघे पक्षाचे काम करत आहेत बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे हे तालुक्यातील जनतेला त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करत असतात तर आंबेडकर चळवळीच्या विरोधात काम करणाऱ्यांना मग तो कोणीही असो त्याच्याविरोधात काम करण्याची तयारी पगारे हे करत असतात
 
 
रिपब्लिकन पक्षांसह जवळपास सर्वच गट शिवसेना भाजपच्या दावणीला…!
मनमाड शहर हे आंबेडकर चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकर विचारधारा मानणारे राजकीय पक्ष आहेत यात रिपब्लिकन पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी,बहुजन समाज पार्टी,लोकजनशक्ती पार्टी यासह इतर छोटे मोठे पक्ष आहेत मात्र यातील जवळपास 90 टक्के पक्ष हे शिवसेना शिंदे गट व भाजपाकडे युतीधर्म म्हणून तर काही इतर कारणाने दावणीला बांधले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!