मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट
मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट
मनमाड(प्रतिनिधी):- मागील आठवड्यात मालेगाव,चांदवड मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे घट झालेल्या तापमानात पुन्हा मोठी वाढ झाली असून मालेगावचे तापमान 41 तर मनमाडचा पारा गेला 39 ते 40 अंशा पर्यंत गेला आहे त्यामुळे उष्णतेची लाट येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपार नंतर सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरू लागला आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाचं सूर्य नारायण आग ओकू लागला असून उष्मा वाढल्यामुळे रसवंती आणि शीतपेय गृह गजबजू लागले आहे आता पासूनच तापमानात मोठी वाढ झाली असल्यामुळे मे महिन्यात काय होईल याची चिंता सर्वांना लागली आहे.उष्णता कमी व्हावी म्हणून नागरिक शीतपेय आणि छत्रीचा सहारा घेत आहेत.
मागील आठवड्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील काही भागात पाऊस कोसळला या पावसामुळे काही काळाकरिता थंड झालेले तापमान पुन्हा एकदा वाढले असून मनमाड नांदगाव चांदवड मालेगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा उष्णतेची लाट उसळली असून मालेगाव मध्ये 41 अंश तर मनमाड नांदगाव भागात 39 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली उन्हाने अंगाची लाही लाही होत असून उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिक थंड पेय तसेच छत्रीचा वापर करताना दिसून येत आहेत दुपारी 12 नंतर ते सायंकाळी साडेचार पाच पर्यंत गावातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट बघायला मिळत आहे उन्हामुळे ग्राहक बाजारात येत नसल्याने त्याचा देखील मोठा फटका व्यवसायिकांना बसत आहे रविवारची आठवडे बाजारात देखील यंदा तुरळ गर्दी बघावयास मिळाली उन्हामुळे त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी काम असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडावे अन्यथा सायंकाळी बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम असल्याने राजकीय पक्षाच्या कार्यालयातच कार्यकर्ते व नेते थांबून राहत आहे सकाळी बारापर्यंत व सायंकाळी चार नंतर उमेदवार कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे उष्माघातामुळे त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांतर्फे करण्यात येत आहे
उष्माघातासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात सहा बेड आरक्षित
सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हामुळे त्रास होऊ नये यासाठी सकाळी बाराच्या आत आपली कामे आटपून घ्यावी ज्यांना शक्य नाही त्यांनी काम करताना सावलीत काम करावे सैल कपडे घालावे डोक्यात टोपी घालावी जास्तीत जास्त पाणी प्यावे लिंबू शरबत मठ्ठा यासारखे पौष्टिक थंड पेय प्यावे शक्यतो काम नसेल तर दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये यासह इतर काळजी घेणे गरजेचे आहे याशिवाय मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघातामुळे काही इमर्जन्सी आली तर यासाठी सहा बेड आरक्षित करण्यात आले असून या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे
डॉक्टर पवन कुमार राऊत अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मनमाड