मनमाड महाविद्यालयात महादेवी वर्मा जयंती उत्साहात साजरी.
मनमाड महाविद्यालयात महादेवी वर्मा जयंती उत्साहात साजरी.
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आधुनिक मिरा या नावाने ज्यांना ओळखले जाते त्या महादेवी वर्मा यांची ११७ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करतांना असताना प्रा.कविता काखंडकी म्हणाल्या की, हिंदी साहित्यिकांनी आपली ओळख फक्त साहित्यिक म्हणून नाही तर समाजसेवक म्हणून ही करून दिली आहे.यात महादेवी वर्माचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.महादेवी वर्मा यांनी काशी हिंदू विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करीत असताना अनेक साहित्यकृतींचे लेखन केले.साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार ही महादेवी वर्मा यांना मिळाला होता असे प्रा.काखंडकी यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.जालिंदर इंगळे हे होते. डॉ.इंगळे यांनी हिंदी विभागातील विविध विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमाचा मागोवा सादर करुन महादेवी वर्मा यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सांगितले व त्यांचे प्राणी मात्रावर असलेले प्रेम विशद केले.हिंदी साहित्यात महत्वाच्या असलेल्या छायावादी काव्यधारेची प्रमुख हस्ताक्षर म्हणून महादेवी वर्मा यांना ओळखले जाते,असे ही प्रो.इंगळे आपल्या अध्यक्षिय समारोप प्रसंगी सांगितले.सूत्रसंचालन अमोल गुंड यांनी व कु.वैष्णवी सातपुते आभार या विभागातील विद्यार्थ्यांनी मानले.या प्रसंगी हिंदी विभागातील एम.ए.आणि बी.ए.वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.