रमाजन निमित्ताने खाण्यापिण्याचे पदार्थांची रेलचेल…!
रमाजन निमित्ताने खाण्यापिण्याचे पदार्थांची रेलचेल…!
मनमाड(अजहर शेख):- मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे पवित्र रमजान महिनाभर उपवास करून रमाजन ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावेळी शिरखुरमा हा खास पदार्थ मुस्लिम धर्मीय यांच्यासह इतर धर्मीयांच्याही तितक्याच पसंतीचा आहे रमाजनच्या उपवासाच्या निमित्ताने फळे व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते सध्या रमजान पर्व सुरू असुन मनमाड शहरातील बाजरपेठ विविध खाण्या पिण्याच्या दुकानांनी सजली आहे.सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळी या दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी बघावयास मिळते.
भारत हा एक असा देश आहे या देशात विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक राहतात व प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या प्रथा येथे आहेत यात मुस्लिम समाज देखील मोडतो मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद होय रमजान ईद निमित्ताने महिनाभर कडक उपवास केले जातात यात पहाटे सहेरी केली जाते दिवसभर काही न खाता पिता(पाणी देखील नाही) उपवास करून सायंकाळी इफ्तारी अर्थात उपवास सोडण्यात येतो यासाठी विविध प्रकारचे फळे यासह चिकन रोल समोसे कबाब यासह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी येतात सध्या या दुकानांनी बाजारपेठ सजली असुन शहरातील नगीना मशीद, जामा मशीद यासह इतर ठिकाणी खाद्यपदार्थ दुकाने लागली आहेत.यानंतर रमाजन ईदच्या दिवशी जो शिरखुरमा बनवला जातो यासाठी लागणारे साहित्य देखील विक्रीसाठी आले असुन याचीदेखी दुकाने लागली आहेत मनमाड शहरातील बाजारपेठ खाण्यापिण्याची दुकानांनी सजली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच वस्तुचे भाव जैसे थे…!
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळा कमी झाला आहे त्यामुळे बाजारपेठ मध्ये मंदी आहे याशिवाय नांदगाव तालुक्यात दुष्काळ परिस्थिती आहे मात्र तरीही बाजारात गर्दी आहे याशिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील रमाजन निमित्ताने लागणाऱ्या सर्वच वस्तुंच्या किंमती जैसे थे आहेत.
– मतीन मंसुरी,व्यापारी
असे आहेत भाव…
शेवया 160 किलो
सुतरफेणी 160 किलो
रोट 120 किलो
खजूर 100 ते 250 किलो
सरबत 160 लिटर
नानं पाव 30 ते 40 (२ नग)
फालुदा 60 (१ नग)

फोटो कप्शन
मनमाड शहरातील रमाजन निमित्ताने खाद्यपदार्थांची लागलेली दुकाने तर दुसऱ्या छायाचित्रात सामूहिक उपवास सोडतना मुस्लिम बांधव (छाया आवेश कुरेशी)