मनमाड शहरांमध्ये मध्यवर्ती भागात देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त ; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई.
मनमाड शहरांमध्ये मध्यवर्ती भागात देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त ; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई.
मनमाड( प्रतिनिधी ) :- मनमाड येथील उत्पादन शुल्क निरीक्षक राज्य उत्पादन येवला विभाग जिल्हा नाशिक यांच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मनमाड येथील गल्ली नंबर ५२ मिर्झा गायकवाड चौक या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने छापा टाकला असता आरोपी नामे मोक्षद जाफर मिर्झा हा देशी दारू भिंगरी संत्रा या देशी मध्याच्या निर्मितीचा अवैध कारखाना खोलून त्या ठिकाणी सदरची देशी दारूची निर्मिती करताना खालील मुद्देमालासह मिळून आला.आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे मुळात मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात हा दारूचा कारखाना सुरू होता याची मनमाड पोलिसांना माहिती नसल्याचे नागरिकांना मान्य नाही मुळात त्यांच्या आशिर्वादाशिवाय हे काम होऊच शकत नाही असा सूर जनतेकडून ऐकायला मिळत आहे.
या कारवाइत २००लिटर समतेचे स्पिरीट भरलेली चार प्लास्टिक ड्रम आठशे लिटर याची किंमत ड्रम सह ५० हजार रुपये इतकी असून, १८० ml क्षमतेच्या एकूण शंभर रिकाम्या बाटल्या ज्याची किंमत अंदाजे रुपये १ कृपया प्रतिबाटलीप्रमाणे १००असून, देशी दारू भिंगरी संत्राचे ७४० कागदी खोके, बनावट देशी दारू भिंगरी संत्राने भरलेल्या १८० मिली समतेच्या ४८ सील बंद बाटल्या ज्याची किंमत ७०प्रति बाटलीप्रमाणे एकूण ३३६०रुपये देशी दारू भिंगरी संत्राचे बनावट ५०० लेबल ज्याची किंमत अंदाजे रुपये शंभर रुपये संत्रा स्वादाचे अंदाजे अडीचशे मिली ज्याची किंमत अंदाजे रुपये पाचशे रुपये व एम एच ४१/७७८६ क्रमांकाचे टाटा कंपनी निर्मित एस मेगा एक्सेल चे चार चाकी मालक वाहन ज्याची किंमत अंदाजे तीन लाख ५० हजार रुपये असून आरोपीच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा जुना गॅलेक्सी ए फाईव्ह झिरो फाईव्ह हा एक मोबाईल ज्याची किंमत अंदाजे दहा हजार रुपये असून सर्व मिळून चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपये मुद्देमालासह कारवाई करण्यात आली सदरची कारवाई डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग शशिकांत गरजे अधीक्षक राज्य उत्पादन नाशिक अमृत तांबारे, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क व्यवसाय विभाग निरीक्षक प्रकाश घायवट व दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्ण मंडलिक सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील जवान सर्वश्री विठ्ठल हाके अमन तडवी यांनी तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सटाणा भरारी पथक नाशिक निरीक्षक गोपाल चांदेकर व दुय्यम निरीक्षक जालिंदर पवार जवान मच्छिंद्र अहिरे अनिल जाधव योगेश मस्के तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभाग नाशिक यांच्या पथकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षकबदकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती वंदना देवरे दीपक गाडे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती सोनाली चंद्र मोरे यांनी सामूहिकपणे यशस्वीरित्या पार पाडले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक हे करीत असून तसेच जनतेस आव्हान करण्यात येत असे आहे की अवैध मध्य विक्री आढळल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागात कळवावे.

शहराच्या मध्यवर्ती कारखाना पोलिस बघ्याच्या भुमिकेत..?
मनमाड शहरात अगदी मध्यवर्ती ठिकाणी हा बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना होता याबाबत गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली मग मनमाड शहर पोलिस करते तरी काय असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.मनमाड शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असुन याचाही पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी मनमाडकर जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.