मनमाडच्या  भुमी क्रिकेट अकॅडमीच्या शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड


मनमाडच्या  भुमी क्रिकेट अकॅडमीच्या शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

Advertisement

मनमाड(आवेश कुरेशी):- नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु शुभम बिडगर याची अगोदर नंदुरबार जिल्हा संघाच्या निवड चाचणी सामण्यात निवड झाली. त्यानंतर निवड चाचणी सामने हे या खेळाडुला नंदुरबार जिल्ह्यात खेळण्यास संधी मिळाली होती ज्यात शुभमने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार जिल्हा संघात स्थान मिळवले. महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत टि 20 निमंत्रण स्पर्धेत ( जिल्हास्तरीय सामने ) शुभमला नंदुरबार संघाकडून खेळण्याचा मान प्राप्त होणार आहे. या सामण्यामधुन महाराष्ट्र प्रीमियर लीग सारख्या नावाजलेल्या व करियर घडवणाऱ्या स्पर्धेत निवड होण्याची शक्यता आहे.या सामन्यांमधुन आपल्यामनमाडच्या या खेळाडुकडुन चांगली कामगीरि होऊन त्याची महाराष्ट्र संघात किंवा महाराष्ट्र प्रिमियम लीग सारख्या स्पर्धेत निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुला दिल्या जात आहे.या निवडीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.या खेळाडुचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन चिरागला लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक  सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!