जिद्द चिकाटी असली तर यश तुम्हाला शोधत येईल : वर्षा भामरे
जिद्द चिकाटी असली तर यश तुम्हाला शोधत येईल : वर्षा भामरे
नांदगाव (महेश पेवाल) :- जिद्द चिकाटी असली कि यश तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत पोहचत असते याची जाणीव शिक्षकांनी विशेषतः महिला शिक्षकांनी ठेवावी असे प्रतिपादन कृतिशील शिक्षिका सौ वर्षा भामरे यांनी केले, नांदगाव भूषण जेष्ठ समाजसेवक डॉ यशवंत (दादा ) बर्वे यांच्या पुढाकारातून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शहरातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या दिवंगत डॉ सुमनताई बर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी शहर व परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व्ही जे हायस्कुल येथे करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या .लक्ष्मीकांत ठाकरे यांनी केले तर प्रमुख पाहुणे चां परिचय श्री प्रविण आहिरे यांनी करून दिला .त्याप्रसंगी सौ भामरे बोलत होत्या अध्यक्षस्थानी संकुल प्रमुख संजीव धामणे होते न्यायडोंगरी येथील जिल्हा परिषेदेच्या केंद्रशाळेचा लोकसहभागातून कायापालट करणाऱ्या कर्तृत्ववान व आदर्श महिला शिक्षिका सौ वर्षा भामरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या पालकांचा विश्वास अन लोकसहभागातून शाळाविकासाला लागणारा हातभार यामुळे अपेक्षित शैक्षणिक बदल घडत असतो असा स्वानुभव त्यांनी यावेळी सांगताना न्यायडोंगरीच्या शाळा विकासातली कहाणी मांडली यावेळी महिला दिनाचे औचित्य साधित शाळेतील महिला शिक्षकांचा स्नमानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
नाशिकचे प्रसिद्ध डॉक्टर जयंत बर्वे यांची विशेष उपस्थिती या सभारंभाला लाभली होती व्यासपीठावर अंजली सोनवणे विजय परदेशी विजय चोपडा डॉ गणेश चव्हाण शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी मोरे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे उपमुख्याध्यापक खंडू खालकर पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव भास्कर मधे, आदी उपस्थितीत होते सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले तर उपस्थितींचे आभार पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव यांनी मानले .







