संभाजी भिडेचा बिना परवानगी कार्यक्रम करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे, मनमाडला भिमसैनिकांचे पोलिसांना निवेदन.. ११ मार्च ला मनमाड बंदची हाक…
संभाजी भिडेचा बिना परवानगी कार्यक्रम करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे, मनमाडला भिमसैनिकांचे पोलिसांना निवेदन.. ११ मार्च ला मनमाड बंदची हाक…
मनमाड(अजहर शेख) :- मागील आठवड्यात शिव प्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा मनमाड येथे नियोजित कार्यक्रम घेण्यात आला मात्र हा कार्यक्रम रात्री दहा नंतर घेण्यात आला या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती पोलिसांनीच दिलेली आहे या दिवशी या कार्यक्रमानंतर त्यांचा निषेध करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र मुकुंद झालटे व त्यांच्या ज्या जातिवादी सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम घेतला त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही मुळात पोलिस निरीक्षक व सबंधित विभागाचे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे येत्या 11 तारखेपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर ११ मार्च रोजी मनमाड शहर बेमुदत बंद करण्याची हाक भीमसैनिकांनी दिलेली आहे.यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडला तर सर्व जबाबदारी पोलिसांची असेल असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर रवींद्र निकम,गुरुकुमार निकाळे,प्रवीण पगारे,प्रदीप साळवे,कोमल निकाळे,नाना निकम,अमोल लंकेश्वर,विशाल पाटील,दीपक गायकवाड,मोनिस चाबुकस्वार,पंकज तायडे,यांच्यासह आदी जणांच्या सह्या आहेत.