संगीता सोनवणेचा सर्वसाधारण स्त्री ते शिवकन्या प्रवास….! ठाणे येथे भारतीय मराठा महासंघतर्फे पुरस्कार प्रदान…


संगीता सोनवणेचा सर्वसाधारण स्त्री ते शिवकन्या प्रवास….! ठाणे येथे भारतीय मराठा महासंघतर्फे पुरस्कार प्रदान…

नांदगाव(महेश पेवाल):- पुर्वी स्त्री म्हटलं की चूल आणि मुल यापलीकडे बघण्याची समाजाला सवय नव्हती आणि कुणी काही करायचे प्रयत्न केले तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणारी पुरूष प्रधान संस्कृती होती मात्र राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांच्यासह अनेक महिलांनी महिलांच्या हक्कांसाठी लढाई लढली आणि त्यांना ते हक्क मिळवून देण्यासाठी या पुरूष प्रधान संस्कृतीशी लढा दिला यातुन संघर्ष करत आज अनेक राजकीय शैक्षणिक सामाजिक व कामगार क्षेत्रात आपण अनेक महिलांना काम करतांना बघतो व त्यांच्या कर्तृत्ववाला सलाम करतो मात्र अजुनही असे काही महाभाग आहेत जे महिलांना डावलण्याचा प्रयत्न करतात.मात्र या सगळ्यावर मात करत महिला आज यशाचे अनेक शिखर सर करताना दिसतात.अशीच एक महिला नांदगाव तालुक्यात असुन जिने  संगीता सोनवणे ते शिवकन्या प्रवास करत आपलेच नव्हे तर तालुक्यासह जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे.आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे समाजकार्यात आलेल्या संगीता सोनवणे आज शिवकन्या म्हणुन जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध झाल्या आहेत गेल्या चौदा वर्षांपासून नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता स्वखर्चाने रोज नित्यनेमाने सेवा करतात पूजा करतात अशा या कामामुळे त्यांनी महिलांचे संघटन तयार केले व आपला सर्व वेळ महिलांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिला.

Advertisement
यात त्यांनी कायम दुर्लक्षित असलेल्या शालेय पोषण आहार म्हणून मदतनीस करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले व त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले व यातूनच त्यांनी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली.यातून त्यांनी नांदगाव मनमाड येवलामालेगाव चांदवड आदी भागांतील महिलांचे संघटन तयार केले व या संघटनेच्या माध्यमातून त्यानी विविध आंदोलन केली नुकतेच त्यांनी महिलांना घेऊन 5 दिवस आमरण उपोषण केले या आंदोलनाची राज्यस्तरीय दखल घेऊन मंत्रालय ते सचिव व केंद्रीय मंत्र्यांपर्यंत विषय पोहचवला व याबाबत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन यावर सकारात्मक निर्णय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यासह नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व स्मारकाचे नूतनीकरण करण्यासाठी एकट्याने उपोषण केले याची आमदार सुहास कांदे यांनी  तात्काळ दखल घेऊन सुमारे 20 लाख रुपये एवढा भरगोस निधी देऊन संगीता सोनवणे यांच्या हस्तेच कामाचे भूमिपूजन केले व काम सुरू केले .यानंतर लोकार्पण सोहळ्याला देखील छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते देखील संगीता सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला यानंतर त्यांना जवळपास 55 पुरस्कार मिळाले यात प्रामुख्याने मुंबई जळगाव भुसावळ अमरावती छत्रपती संभाजी नगर नांदेड जालना अहमदनगर यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले यात अनेक पुरस्कार हे  मातब्बर राजकीय नेते चित्रपट अभिनेत्री अभिनेते यांच्या हस्ते मिळाले यात त्यांना फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच मनमाड येथे कुळवाडी भूषण पुरस्कार मिळाला आता नुकताच त्यांना वैजापूर येथील संस्थेने राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर केला असुन आज ठाणे येथे भारतीय मराठा महासंघ तर्फे स्थानिक आमदार रवींद्र फाटक व आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान होणार होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जावे लागल्याने ते येऊ शकले नाही असे मत आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले यावेळी संगिता सोनवणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!