लोकशाहीत काळे सफेद झेंडे दाखवण्याचा अधिकार : नामदार भुजबळ
मनमाड(प्रतिनिधी):- प्रत्येकाला लोकशाहीत काळे सफेद झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे त्यामुळे याबाबत मी बोलणार नाही मात्र पंकज त्या गावाला जाणार नव्हता त्या रस्त्याने जाणार होता मात्र तिथे जे जमले होते ते मराठा आंदोलक नव्हते ते स्थानिक राजकिय कार्यकर्ते होते त्यांनी पोलिसांसमोर धमकी दिली की भुजबळ कुटुंबातील कोणीही इथे आले तर त्यांचे हातपाय तोडू हे आक्षेपार्ह आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा व कारवाई करावी असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले मनमाड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उदघाटणासाठी ते मनमाडला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.



मतदान जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला जे करायचं ते करा आता अशी भाषा वापरणे योग्य नाही असेही भुजबळ म्हणाले नवीन चिन्ह मिळाले याचा जास्त परिणाम होणार नाही मात्र खेड्यापाड्यात जसे घड्याळ डोक्यात फिट आहे तसे त्यांची इच्छा असली पवार साहेबांना मतदान करायचे तरी ते घड्याळाला करतील लोक हुशार आहेत कोणला कुठे बसवायचं हे त्यांना कळत जे चांगलं काम करतात त्यांना ते निवडून देतात ज्यांना खात्री आहे की ही जागा आपल्यालाच मिळणार त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.बाकीच्या ठिकाणी महायुती असो वा महाविकास आघाडी त्यांच्या जागा वाटप अजुन व्हायच्या बाकी आहेत.यासह अनेक प्रश्नांची उत्तरे भुजबळ यांनी दिली.यानंतर नियोजित कार्यक्रमात देखील भुजबळ यांनी आपली फटकेबाजी सुरू ठेवली आपल्या भाषणात ते म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा राज्यात नव्हे तर देशातील एक नंबरचा शेतकरी आहे अनेक देशात आपल्या देशातील नाशिक जिल्ह्याचा द्राक्ष जातो यामुळे शेतकरी हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. बाजार समितीचे सभापती दीपक गोगड व गणेश धात्रक यांचे काम चांगले आहे हळूहळू केलेलं काम जास्त काळ टिकत जे एकदम जोरात आले आहेत त्यांना जोरात खाली यायच आहे अशी खरमरीत टीका त्यांनी आमदार कांदे यांचे नाव न घेता केली.काय करणार एवढे पैसे 100 गाड्या 100 बंगले घेतले तरी एकातच फिरणार ना एकातच झोपणार ना मग का एवढा हव्यास असेही ते म्हणाले नांदगाव तालुक्यातील जनता हुशार आहे त्यांना माहिती आहे कोण कसे आहे ते बरोबर वेळेवर कार्यक्रम करतात असेही ते म्हणाले यावेळी दीपक गोगड यांनी आपल्या भाषणात भुजबळ साहेब कार्यकर्त्यांचा कंटाळा न करणारा नेता आहे मी जेव्हापासून भेटलो तेव्हापासून फक्त तक्रारी करतो हे पाहिजे असं करा तसं करा मात्र ते कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता काम मार्गी लावतात असा नेता मी बघितला नाही यावेळी मंचावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक,माजी पणन संचालक सुनील पवार मालेगावचे राजेंद्र भोसले,शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड, नांदगाव बाजार समितीचे संचालक दर्शन आहेर,यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी दीपक गोगड कैलास भाबड रमेश कराड यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.आज जे कृषी प्रदर्शन भरवले आहे ते कायम भरवायला हवे असे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले.
राज्यातील बाजार समित्यानी हिंगणघाटचा दौरा करावा
मी येथे आलो आणि बाजार समितीचे कामकाज बघितले मला असे समजले की यांनी 1 कोटी रुपये एफडी केले मात्र मी याउलट म्हणेन त्यानी हे पैसे खर्च करावे व शेतकरी व बाजार समितीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व घटकांना विविध सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी येथे माल घेऊन विक्रीसाठी येतील यासह मी जेव्हा संचालक होतो तेव्हा हिंगणघाट दौरा केला तेथील बाजार समितीचे कामकाज हे आदर्श घेण्यासारखे आहे तर राज्यातील बाजार समितीचे अध्यक्ष सदस्य यांनी आवश्य भेट देऊन पाहणी दौरा करावा असे मी सांगेल.
हातपाय तोडण्याच्या धमक्या देणं योग्य नाही….!
दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला पंकज भुजबळ ज्या रस्त्याने जाणार तेथे काही राजकीय मंडळी मराठा आंदोलक बनून निषेध करणार होते मात्र तेथे दौरा नसल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले परंतु तेथे एकजण सरळ भुजबळ परिवारातील कोणीही आले तर हातपाय तोडण्याचे म्हणतो आहे हे योग्य नाही पोलिसांनी याचा शोध घेऊन कारवाई करावी