शिवसेनेमुळेच मी आमदार झालो : सुहास कांदे मनमाडला छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा संपन्न
शिवसेनेमुळेच मी आमदार झालो : सुहास कांदे
मनमाडला छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा संपन्न


मनमाड(आमिन शेख):- माझ्या आधी बलाढ्य माणसाने दहा वर्षे मनमाड नांदगाव मतदार संघाचे नेतृत्व केले त्यांच्याकडुन शक्य असतानाही त्यांनी मनमाडच्या जनतेचे एकही स्वप्न पूर्ण केले नाही मात्र मनमाड करांच्या प्रेमामुळे व शिवसेना पक्षामुळेच मी आमदार झालो आणि याचे ऋण फेडण्यासाठी मी सर्व शक्ती पणाला लावली आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम करू शकलो असे स्पष्ट मत मनमाड नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केले यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत काही लोक स्वतःला ओबीसींचे नेते म्हणताय आणि मराठा आरक्षणाला विरोध करताय मात्र मी आज या मंचावरून ग्वाही देऊन सांगतो की येत्या 20 फेब्रुवारी रोजी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समजला दिलेल्या आद्यदेशाची श्वेतपत्रिका निघेल मग त्याच कायद्यात रूपांतर होईल असेही कांदे यांनी यावेळी सांगितले.



यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे,माजी आमदार राजेंद्र देशमुख, अल्ताफ खान,नितीन पांडे, पंकज खताळ,नांदगावचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे राजेंद्र भाबड,फरहान खान,अंजुम कांदे,साईनाथ गिडगे, योगेश पाटील,यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पगारे यांनी आपल्या भाषणात मी कोणत्याही पक्षाचा म्हणून येथे आलेलो नाहीं केवळ विकासाच्या मुद्द्यावर मी सुहास कांदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले तर नितिन पांडे व इतर मान्यवरांनी आपल्या भाषणात विकास कामाचा आढावा घेतला शहरप्रमुख मयुर बोरसे यांनी प्रास्ताविक केले तर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी पालिकेच्या वतीने आमदार कांदे यांचे स्वागत करून आभार मानले यावेळी आमदार कांदे यांनी चौफेर फटकेबाजी केली व मी रक्ताच्या शेवटच्या थेंब असेपर्यंत आपली सेवा करत राहील असे सांगितले.यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तसेच मराठा समाजच्या वतीने व पत्रकार संघाच्या वतीने आमदार कांदे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुहास कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले व त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली यानंतर मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली यावेळी महिला पुरुषांनी डिजेच्या तालावर ठेका धरला त्यास आमदार सुहास कांदे यांनीही प्रतिसाद दिला व त्यांनीही जनतेसोबत डान्स केला.अभूतपूर्व वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.