मनमाड शहरात भाजपा चे बूथ चलो संपर्क अभियान
मनमाड शहरात भाजपा चे बूथ चलो संपर्क अभियान
मनमाड(आवेश कुरेशी):- भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या निर्माणासाठी ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांचेही योगदान
असावे या भावनेची जोड आहे. याच धर्तीवर बूथ चलो अभियान राबविण्यात येत आहे याच अभियाना अंतर्गत फिर एक बार मोदी सरकारचा नारा मनमाड भाजपा ने दिला आहे भाजपा नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांचे मार्गदर्शनाने भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी जिल्हा चिटणीस नितीन परदेशी विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांचे नेतृत्वा मध्ये मनमाड शहरातील स्वा.वीर सावरकर नगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, रेल्वे फिल्टर हाऊस,महर्षी वाल्मिकी नगर, आयुडीपी,शकुंतल नगर,सराफ बाजार, मानके कंपाउंड, सुभाष रोड,,इदगाह परिसर,माधव नगर चांदवड रोड आनंद विहार कॉलनी,या परिसरातील प्रत्येक बूथ वर हे जनसपंर्क अभियान राबविण्यात आले या अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वा मधील केंद्र सरकार च्या 10 वर्षाच्या लोककल्याणकारी योजना ची माहिती देणारे पत्रक देण्यात आले तसेच पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान मुद्रा योजना, पंतप्रधान स्व निधी योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्वला गॅस योजना,या योजना चा प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या लाभार्थीशी देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी संवाद केला तसेच प्रमुख ठिकाणच्या खाजगी भिंती वर अब की बार मोदी सरकार भाजपा चे कमळ बार बार मोदी सरकार असे दिवार लेखन पदाधिकारी बूथ प्रमुख यांनी केले या अभियानलां नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला मनमाड शहरात सर्वच प्रभागांमध्ये हे अभियान सुरु आहे या अभियान मध्ये वरील पदाधिकाऱ्यां सह भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे, भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे, भाजपा शहर उपाध्यक्ष गोविंद सानप, आशिष चावरिया नजमा अन्सारी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा चिटणीस सुनीता वानखेडे, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा शहर चिटणीस केतन देवरे, रवी नायर सुनील खैरनार आदी प्रमुख पदाधिकाऱ्या सह भाजपा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ वारियर, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला या बूथ चलो संपर्क अभियायानाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे आणि पदाधिकारी नी केले