प्रत्येक घरामध्ये जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई यांचे विचार रूजत नाही तोपर्यंत खरी स्त्रीमुक्ती चळवळ निर्माण होणार नाही : सौ रेश्मा पगारे
प्रत्येक घरामध्ये जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई यांचे विचार रूजत नाही तोपर्यंत खरी स्त्रीमुक्ती चळवळ निर्माण होणार नाही : सौ रेश्मा पगारे
मनमाड(प्रतिनिधी):- १२ व १३फेब्रुवारी १९३८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे युवक,महिला व कामगार परिषद घेतली होती या परिषदेचा ८७व्या वर्धापनदिनानिमित्त त्या स्मृतीस उजाळा देऊन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन महिला आघाडी कारखाना शाखा तर्फे कामगार व महिला परिषद १३ ऑक्टोबर २०२४ रोजी असोसिएशन च्या नुतन कार्यलय परिसरात घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायकवाड हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी झोनल सचिव सतिश केदारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे (नाशिक), झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, कारखाना शाखाचे कार्याध्यक्ष किरण आहीरे, कारखाना शाखाचे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव सागर गरूड, ओपन लाईन शाखा मनमाडचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, ओपन लाईन शाखा चे खजिनदार रत्नदीप पगारे, कारखाना शाखा चे माजी कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, महिला आघाडी च्या संध्या सोनवणे, रेखा जाधव पत्रकार अमिन नवाब शेख, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८६वर्षीपुर्वी महिला, युवक व कामगार यांची परिषद घेतली होती.यावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी लक्षात येते की सामाजिक व राजकिय क्षेत्रात महिला, युवक व कामगार यांची अश्यकता आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ८६ वर्षांपूर्वी सांगितले आहे असे विचार कामगार नेते सतिष केदारे यांनी आपल्या भाषणातून मांडले जो पर्यंत प्रत्येक घरामध्ये माता जिजाऊ, माता सावित्रीबाई,माता रमाई यांचे विचार रूजत नाही तोपर्यंत खरी स्त्रीमुक्ती चळवळ निर्माण होणार नाही असे विचार रेश्मा रत्नदीप पगारे यांनी यावेळी मांडले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केले कार्याचा आढावा रेखा जाधव यांनी आपल्या भाषणातून मांडला.जो पर्यंत प्रत्येक स्त्री ही पुरुषांप्रमाणे साक्षर होते नाही तोपर्यंत सामाजिक प्रगती अशक्य आहे असे मत अध्यक्षीय भाषणात गायकवाड यांनी मांडले.सिद्धार्थ जोगदंड, अमिन नवाब शेख, फिरोज शेख, मिलिंद देहाडे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सागर साळवे यांनी केले.यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन व असोसिएशन महिला आघाडी च्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, सचिन इंगळे, राकेश ताठे, विनोद झोडपे, सिनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे खजिनदार संतोष सावंत, सदस्य दिपक अस्वले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, बहुजन युवक संघ चे कार्याध्यक्ष नदिम सैय्यद, सचिव नवनाथ जगताप, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, सुनिल सोनवणे, विनोद खरे, फकिरा सोनवणे, विलास कराड, निखिल सोनवणे, अनिल अहिरे, हर्षद सुर्यवंशी,प्रभाकर निकम, गणेश वेन्नाल्लु, अभ्युदय बागुल प्रशांत मोरे, दिपक राऊत, विशाल त्रिभुवन, विशाल सत्रंमवार, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे,राहुल शिंदे,सागर साळवे, विशाल घोडके, सुमित आहिरे, जयंत जगताप, सचिन गरुड,मनिष कासवटे, अनिल बोरसे, अर्जुन बागुल आदी ने केले