आंबेडकर चळवळीसह कामगार संघटनांना पडला डॉ आंबेडकर यांच्या कामगार परिषदेचा विसर…?


आंबेडकर चळवळीसह कामगार संघटनांना पडला डॉ आंबेडकर यांच्या कामगार परिषदेचा विसर…?


Advertisement
मनमाड(प्रतिनिधी):-भारतीय कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल, असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत व्यक्त करून ज्यांनी १२ व १३ फेब्रुवारी १९३८ साली मनमाडला ऐतिहासिक कामगार परिषद घेतली त्याच आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या मनमाड शहरातील सर्वच आंबेडकरी चळवळीतील पक्ष कामगार संघटना यासह सर्वाना या दिवसाचा विसर पडल्याचे चित्र बघावयास मिळाले असुन एकाही मायच्या लालने त्या ऐतिहासिक मैदानावर कार्यक्रम तर सोडा पण साधे अभिवादन सुध्दा केले नाही  दिवसेंदिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फक्त राजकीय वापर होतो की काय ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.ही बाब अत्यंत दुर्दैवी असुन त्यांचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांनी जे मूलमंत्र दिले त्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
              डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना फार दूरदृष्टी होती १२ फेब्रुवारी १९३८ साली त्यांनी मनमाडला कामगार परिषद घेऊन त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले होते ब्राम्हणशाही व भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत आणि आज त्यांचे विचार अगदी तंतोतंत खरे ठरताना दिसत असुन आजची कामगारांची परिस्थिती बघता हे दोन शत्रू आता मोठया प्रमाणावर त्रास देत आहे.आज आता अनेक सरकारी नोकरीत कंत्राटी ठेकेदारी पद्धत अवलंबण्यात येत आहे तर अनेक सरकारी प्रकल्प हे खाजगी कंपन्याना देण्याचा धडका सुरू आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र आता वापरण्यात कमतरता येत असल्याने सध्या देशातील प्रत्येक ठिकाणी कामगाराची वाईट अवस्था आहे अशा या महान नेत्यांनी आपल्यासाठी काय काय केलं हे लक्षात ठेवून साधे अभिवादन देखील एकही आंबेडकर चळवळीच्या पक्षाने केले नाही की कामगार संघटना यांनी केले  नाही. ही अत्यंत वाईट बाब असुन त्यांच्या नावाचा केवळ राजकीय स्वार्थापोटी वापर करतांना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!