शिवकन्या संगीता सोनवणे यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार जाहिर..!
शिवकन्या संगीता सोनवणे यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार जाहिर..!
नांदगाव(महेश पेवाल):- संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ नांदगावच्या शिवकन्या व समाजसेविका सौ संगीता सोनवणे यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत मोटे यांनी प्रसिद्धीस दिली असुन शिवजयंती नंतर हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.
सौ संगीता सोनवणे यांचे शिवकार्य सर्वश्रुत असुन त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे जवळपास 43 पुरस्काराने आजवर त्यांना सन्मानित करण्यात आले असुन यंदाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन ठिकाणी पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यातील संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.काही दिवसात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराची घोषणा होताच सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.