मुफ्ती सलमान अजहरी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी मनमाड शहर मुस्लिम बांधवांतर्फे निवेदन द्वारे मांगणी
मुफ्ती सलमान अजहरी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी मनमाड शहर मुस्लिम बांधवांतर्फे निवेदन द्वारे मांगणी
मनमाड(प्रतिनिधी):- मुस्लिम धार्मिक गुरु,मुफ्ती सलमान अजहरी बुधवारी गुजरातच्या जुनागडमध्ये, बी डिव्हिजन परिसरात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचा 20 सेकंदांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला सदर व्हिडीओ क्लिप मध्ये कोणतेही आक्षेपार्य विधान नाही, असे असतांना देखील मुफ्ती सलमान अजहरी साहब यांना गुजरात आणि मुंबई ATS यांनी अटक केली आहे. व मुफ्ती सलमान अजहरी साहेब यांच्यावर एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे हे खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना तत्काळ सोडून देण्यात यावे अशी मागणी मनमाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की मुफ्ती सलमान अजहरी साहेबांनी गुजरातमधील जुनागढ येथे वाचलेल्या कथनात त्यांनी कोणत्याही समुदायाविरुद्ध किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध काहीही आक्षेपार्ह म्हटले नाही. महाराष्ट्र आणि गुजरात एटीएसचे पथक त्याला विनाकारण खोट्या प्रकरणात अडकवत आहेत.तसेच गुजरात एटीएसने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या नियम 41 चे उल्लंघन केलेले असून त्यांच्या तर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन देखील करण्यात आलेले नाही, धार्मिक गुरु मुफ्ती सलमान अजहरी साहेब यांना कोणतेही वॉरंटशिवाय अटक केली आहे, मुफ्ती सलमान अजहरी साहेब मुस्लिम समाजातील मोठे धार्मिक गुरु आहे, त्यांच्याशी मुस्लिम समाज्याची धार्मिक भावना जुडलेली आहे, तरी या प्रकरणाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी व मुफ्ती सलमान अजहरी साहेबांवर दाखल खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन, लवकरात लवकर त्यांची सुटका करावी.असे मांगणीचे निवेदन मनमाड शहर मुस्लिम बांधवांतर्फे पोलीस विभागामार्फत शासनास देण्यात आले, या वेळी, जामा मस्जिद ईमाम मौलाना असलम रजवी साहेब, हाफिज वसीम, मौलाना मुजम्मील, मौलाना मंजूर,मौलाना मोहम्मद रिजवान, मौलाना कमरुद्दीन, कारी राहत, सादिक भाई पठाण,फिरोज शेख,हाजी शफी मुसा,इस्माईल पठाण, मोहसीन शेख, शेरखान पठाण,अकील शेख, रहीम शेख,जावीद शाह, अकबर शेख, शफाफ हुसैन,वसीम सैय्यद, रफिक शेख, शब्बीर शेख,मुसा शेख, शमशेर शेख, समीर शेख, कादीर शेख,आदी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते,
फोटो कॅप्शन
मनमाड शहर पोलिस निरीक्षक यांना निवेदन देतांना मनमाड शहरातील मुस्लिम धर्मगुरू व समाज बांधव…(छाया आमिन शेख)