राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप नांदगाव यांच्या वतीने रमाई जयंती साजरी..!


नांदगाव (महेश पेवाल):-  माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांचा कार्यक्रम नांदगाव मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या तर्फे माता रमाई यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रम करण्यात आला.समाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप नांदगाव यांच्या वतीने दर वर्षी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्रातील जन्माला आलेल्या अनेक महापुरुषांचे प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यंदा देखील *महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रंररर* भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कडूबाई खरात यांच्या हस्ते माता रमाई यांना मेणबत्तीदिप प्रज्वलित करून गुलाब पुष्प वाहुन वंदन करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील बुलंद तोफ भुषण लोंढे मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक,नांदगावचे उपगराध्यक्ष नितिन जाधव विनोद शेलार, तसेच वैद्यकीय, शैक्षणिक,समाजिक, सांस्कृतिक, क्रिडा,क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती यावेळी आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन कडुबाई खरात यांच्या हस्ते सर्वांचे सत्कार करण्यात आले होते.

Advertisement

तसेच नांदगाव आंबेडकर नगर येथील नव वधु वर सिध्दांत व साक्षी काकळीज यांच्या परिवाराच्या वतीने व शहरातील अनेक बहुजन समाजातील महिला मंडळाच्या वतीने कडूबाई खरात यांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर कडूबाईंच्या पहाडी आवाजत प्रबोधन गीत सादर करण्यात आले कडूबाई हे चाहत्यांसमोर येताच फटाकेंच्या आतिषबाजीत, टाळ्यांचा,घोषणांचा एकच जोरदार आवाज घुमु लागला होता…*”जय जय जय जय भिम जय भिम जय भिम “* संपूर्ण परिसर दणाणुन सोडला होता या गीत गाण्यासाठी चाहत्यांनी हाजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी व बहुजन समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या मातारमाई जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मसेवक आनंद पवार यांनी केले तर सन २००५ ते २०२४ पर्यंतचा समाजिक क्षेत्रात कार्यक्रमाचे अहवाल देखील यावेळी जनते समोर शाहू महाराज ग्रुपचे मार्गदर्शक नितिन जाधव यांनी सादर केले होते. तसेच कडूबाई खरात यांच्या सोबत लहान मोठ्यां पासुन सर्वच फॅन सेल्फीचा मनसोक्त गप्पा मारत आप आपल्या मोबाईल मध्ये एक अविस्मरणीय क्लिक कैद करतांना दिसत होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर(नाना) जाधव अध्यक्ष प्रशांत गरुड, उपाध्यक्ष दिपक मोरे तसेच किरण पवार, गौतम काकळीज, प्रमोद पगारे, प्रवीण गरुड, प्रवीण इघे विलास लोखंडे,सोहेल रंगरेज,जफर शेख,सोमनाथ चौधरी, ऋषी जाधव, यांच्यासह सदस्यांनी मेहणत घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!