जातेगाव एकलव्य महिला मंडळाचा ग्रामपालिकेवर मोर्चा
जातेगाव एकलव्य महिला मंडळाचा ग्रामपालिकेवर मोर्चा
बोलठाण (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जातेगाव येथील एकलव्य महिला मंडळाचा दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी शुक्रवारी भिल समाजाच्या समाज मंदिरासाठी जागा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी जातेगाव ग्रामपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील एकलव्य महिला मंडळ संघटनेच्या वतीने नांदगाव पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भिल्ल समाजाच्या समाज मंदिरासाठी जातेगाव ग्रामपालिकेने ग्रामपंचायतीच्या जागेवर जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एकलव्य महिला मंडळ संघटनेच्या वतीने काढण्यात येणार आहे.असे म्हटले आहे. गिताबाई रतन सोनवणे व पंधरा ते सोळा महिलांच्या सह्या व अंगठे असून याबाबत जातेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कडूबा महाले यांनी सदर मोर्चा बाबत माहिती दिली.