मनमाडला आज डॉ आंबेडकर यांच्यापूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण…! हेलिकॉप्टरमधुन होणार पुष्पवृष्टी


मनमाडला आज डॉ आंबेडकर यांच्यापूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण…!

हेलिकॉप्टरमधुन होणार पुष्पवृष्टी…
मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड शहरातील जनतेची गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची निर्मिती व्हावी अशी मागणी होती यासाठी अनेक आंदोलने ठराव करण्यात आले मात्र शासकीय स्तरावर यास मंजूर मिळत नव्हती मात्र आमदार सुहास कांदे यांनी अथक प्रयत्न करत शासन स्तरावर या दोन्ही पुतळ्यांना मंजुरी मिळवून आणली यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आज रमाबाई आंबेडकर जयंती दिली अखिल भारतीय भिकू संघाचे अध्यक्ष राहुल बोधी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येत असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पृष्टी देखील करण्यात येणार असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले
              मनमाड शहर हे आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते मनमाड शहरात 1960 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांचे अर्धकृती पुतळे बसविण्यात आले होते दिवसेंदिवस या पुतळ्यांना पूर्ण कृती स्वरूप द्यावे अशी मागणी जोर धरू लागली यासाठी अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी आंदोलने केली यासह नगरपालिकेच्या साधारण बैठकीत अनेक ठराव करण्यात आले मात्र शासन स्तरावर याला नामंजूर मिळत होती अखेर आमदार सुहास कांदे यांनी यात हात घालून शासन स्तरावर सर्व मंजुरी मिळून वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत सुमारे 50 लाख रुपये निधी वर्ग करून दिला या पुतळ्याचे आज मोठ्या थाटात लोकार्पण होत आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी शहरातून जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण शहराला निळ्या पताका आकर्षक विद्युत रोषणाई शुभेच्छांचे डिजिटल फलक यासह फुलांनी सजावट करण्यात आली आहे अखिल भारतीय भिकू महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल बोधी यांच्या हस्ते उद्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार आहे या लोकार्पण सोहळ्या वेळी हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी करण्यात येणार असून सायंकाळी लेझर शो व भीम गीतांचा कार्यक्रम देखील होणार आहे शहरातील सर्व आंबेडकर चळवळीतील जनतेने या सोहळ्याला सहभागी व्हावे असे आवाहन आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे करण्यात आले आहे
संपूर्ण शहराला करण्यात आली सजावट
मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मनमाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतातील दुसऱ्या क्रमांकाची जयंती साजरी करण्यात येते यासाठी देशभरातून आंबेडकरांनी सहभागी होतात त्यावेळी ज्या प्रकारे सजावट करण्यात येते तशाच प्रकारची सजावट उद्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी करण्यात आली आहे विशेष म्हणजे उद्या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे लोकार्पण  होणार असल्याने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे यामुळे संपूर्ण शहराला सजावट करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!