350 वा शिवराज्यभिषेक आणि प्रजासत्ताक दिनी अंकाई किल्ल्यांवर ध्वजारोहण
350 वा शिवराज्यभिषेक आणि प्रजासत्ताक दिनी अंकाई किल्ल्यांवर ध्वजारोहण
मनमाड(अजहर शेख):-350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने सार्वभौम हिंदवी स्वराज्य निर्माण झाले, त्यावेळी स्वराज्याचे सर्वात महत्त्वाचे शिलेदार होते, किल्ले. त्याच्या भक्कम पाठबळावरच स्वराज्य निर्माण झाले.हे वर्ष 350वे शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हे वर्ष साजरे करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला होता. नाशिक जिल्हयातील अंकाई- टांकाई किल्ल्यावर 26 जानेवारी 2024 रोजी, संस्करप्रज्ञा संस्था आणि अंकाई गावातील शाळेचे शिक्षक आणि 9वी चे विद्यार्थी यांनी किल्ल्यावर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा व भगवा ध्वज फडकावून, राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. आज 16 जानेवारी 1950 ला भारत सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले त्याचे औचित्य साधत, 26 जानेवारी भारत प्रजासत्ताक दीन आणि शिवराज्याभिषक वर्ष साजरे करण्यात आले.गडकोट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, असंख्य मावळ्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे, पराक्रमाचे प्रतीक आहे. त्यामुळे गडकोट हे स्मृतीस्थाने आहेत. प्रेरणास्त्रोत आहेत, या उपक्रमा द्वारे अधोरेखीत कऱण्यात आले.या उपक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज गडकोट स्वराज्यातील सरदार व मावळे यांना मानवंदना देण्यात आली त्याच बरोबर आलेल्या सर्व शिवप्रेमीनी किल्ला संवर्धन आणि संरक्षनासाठी प्रतिज्ञा घेतली.. किल्ल्यावर असलेला कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या कचरा गोळा करून खली आणला..महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी यांना अधिक अधिक संख्येने सहभागी होण्यास आवाहन करत आले होते..नाशिक जिल्ह्यातील अनकाई टँकाई किल्ल्यावर मागील 22 वर्षापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी प्रजसत्तक दिनी, होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास मनमाड मधील संस्करप्रज्ञा आणि रांनपाखर निसर्ग भ्रमंती संस्था सक्रिय सहभागी असते..
आजच्या उपक्रमात अंकाई विद्यालयाचे शिक्षक श्री संजय पाटील सर, कोतवाल अक्षय गायकवाड, संस्कारप्रज्ञा संस्था अध्यक्ष श्री. अनिल चव्हाण, संस्था पदाधिकारी श्री.मिलिंद वाघ सर, किल्ला संवर्धन प्रमुख श्री. संतोष सोनवणे सर आणि गडकोट, शिवप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते..