“प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता मूल्य समर्थन या आशय सूत्रावर आधारित अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, अमळनेर. येथे प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनाला उत्तर देणार!
“प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता मूल्य समर्थन या आशय सूत्रावर आधारित अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, अमळनेर. येथे प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनाला उत्तर देणार!
“प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता मूल्य समर्थन या आशयसूत्रावर आधारित अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, अमळनेर येथे आयोजित करून नाशिक,उदगीर,वर्धा पाठोपाठ अमळनेर येथे प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही ने रणशिंग फुंकले आहे.विद्रोही च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड झाली असून सुप्रसिद्ध हिंदी व्यंगकवी संपत सरल उद्घाटक तर प्रख्यात उर्दू साहित्यिक रहेमान अब्बास प्रमुख पाहुणे.
मनमाड(प्रतिनिधी):- खान्देशातील अमळनेर येथे दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०२३ रोजी अठराव्या विद्रेाही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर हे कर्मभूमी राहिलेल्या साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमलेनाचे आशयसूत्र ’प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता‘ या मूल्य समर्थनार्थ आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभलेले व्यंगकवी संपत सरल व साहित्य अकादमी विजेते प्रख्यात उर्दू साहित्यिक रहेमान अब्बास प्रमुख पाहुणे लाभणार आहेत महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून विद्रोही मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) ,अमरावती, नंदुरबार, मनमाड, वाशी (नवी मुंबई), सिंधुदुर्ग, धुळे, बुलढाणा , परभणी, हिंगोली, नाशिक, उदगीर, वर्धा इ. ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील आयु. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार,प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर, प्रा. डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते,चंद्रकांत वानखेडे आदी सर्जनशील, साहित्यिक, नाटककार, कवी, समीक्षक आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवित विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज आपल्या अध्यक्षीय मांडणीतून बुलंद केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.
१८ व्या अ.भा.विद्रोही साहित्य संमलेन, अमळनेर येथील प्रस्तावित अध्यक्ष . डॉ वासुदेव मुलाटे यांनी विपुल प्रमाणात, दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे. ’विषवृक्षाच्या मुळ्या‘ ही कादंबरी, ’व्यथाफूल‘, ’अबॉर्शन आणि इतर कथा’, ’अंधाररंग’, ’झाड आणि समंध’ इ. कथासंग्रह ’झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथन इत्यादी ललित साहित्य प्रसिद्ध असून ’सहा दलित आत्मकथने’, ’ग्रामीण कथा स्वरूप व विकास’, ’ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा’, ’नवे साहित्य नवे आकलन’, साहित्य : ’रूप आणि स्वरूप’, ’ग्रामीण साहित्य चिंतन आणि चर्चा’, ’साहित्य, समाज आणि परिवर्तन’ इत्यादी समीक्षात्मक ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र, आत्मकथन इत्यादी विविध साहित्य प्रकारांमधून त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे आजवर सहा कथासंग्रह, एक कादंबरी, चौदा समीक्षात्मक ग्रंथ, एक दीर्घ कथा संग्रह, एक एकांकिका आणि आत्मकथनासह पंधरा संपादित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.संपत सरल, आज हे नाव जगभर विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध आहे. . हास्य व व्यंगाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारा विद्रोही कवी म्हणून त्यांनी जगभर आपला ठसा उमटवला आहे. संपत सरल यांनी संपूर्ण भारतासह विविध देशात आपले काव्य आणि मुशायरा सादर केले आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जाते. ’चाकी देख चुनाव की’ आणि ’छद्मविभूषण’ हे त्यांचे काव्य संग्रह तर ’हम है ना’, ’करम धरम’, ’चक्कर पे चक्कर’, ’बेटा बेटी के लिए’, ही टीव्ही वरील नाटके प्रसिद्ध आहेत. तर रहेमान अब्बास हे प्रख्यात उर्दू कादंबरीकार विद्रोही संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.रहेमान अब्बास हे मूळ चिपळूण चे रहिवासी असुन त्याना रोहजिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पारितोषक २०१८ मध्ये मिळाले आहे तर २०११ व२०१७ च्या राज्य पारितोषिक चे ते मानकरी आहेत. उर्दू बरोबरच इंग्रजी तून त्यांची हाईड अँड सीक इन द श्याडो ऑफ गॉड ही कादंबरी प्रसिद्ध आहे.राजकारण आणि प्रेम हे त्यांच्या लिखाणात महत्वाचे विषय आहेत. सामाजिक कार्यकर्ते शामदादा पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.यंदाचे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मध्ये भरविले जाणार आहे. संमेलन आम्ही ‘खरा तो एकचि धर्म,जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या सूत्रावर आधारित घेत आहोत. अमळनेर धुळे रोडवरील आर. के. नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार असून दोन दिवस चालणार्या या संमेलनात ४ परिसंवाद, २ कवी संमेलने,१२ गटचर्चा, कथाकथन, युवा मंच,गझल संमेलन,नाटक, एकपात्री, बालमंच, विचार यात्रा इ. कार्यक्रम असणार आहेत.खानदेशात साने गुरुजींच्या कर्मभूमीत व त्यांच्या १२५ व्या जन्मवर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विद्रोही साहित्यिक व समविचारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकाद्वारे अर्जुन बागुल (उपाध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य), अमिन नवाब शेख, यशवंत बागुल (राज्य कार्यकारिणी सदस्य विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य), कवी राजू लहिरे, फिरोज शेख,सतिष केदारे गुरुकुमार निकाळे आदी ने केले आहे.
– आपले स्नेहांकित –
(अमिन नवाब शेख,),राज्य कार्यकारिणी सदस्य ,विद्रोही सांस्कृतिक चळवळ.
———————————————