सुप्रसिद्ध विद्रोही कवी संपत सरल करणार अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन..!


 

मुंबई : येत्या 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी येथे अमळनेर येथे भरणार्‍या 18 व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार व निमंत्रक रणजित शिंदे उपस्थित होते.आजच्या आधुनिक काळात, संपत सरल यांच्याकडे एक व्यंग्यात्मक कवी म्हणून पाहिले जाते. आज ते सोशल मीडियावर राजकीय समस्या आणि मुद्द्यांचे विडंबन करताना दिसतात.संपत सरल यांच्या काव्य वाचनाचे देश विदेशात कार्यक्रम झाले असून, समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जातात. ते आपल्या सत्य आणि निर्भिड अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. ‘चाकी देख चुनाव की ‘ आणि ‘ छद्मविभूषण ‘ हे त्यांचे काव्य संग्रह प्रकाशित आहेत.हम है ना, करम धरम, चक्कर पे चक्कर, बेटा बेटी के लिए, ही टीव्ही वरील नाटके प्रसिद्ध आहेत.संपत सरल रंगमंचावर अप्रतिमरित्या कविता सदर करतात, तसेच ते साहित्याचे अभ्यासकही आहेत. तो कोणत्याही निस्तेज वातावरणात पूर्ण ऊर्जा निर्माण करणारी अशी त्यांची कविता आहे. ते कवितेतून समाज, मूल्ये आणि राष्ट्रांबद्दल विचार करायला भाग पडतात; अर्थातच गुदगुल्या करत, ते विरोधाभासाला लिलया चिमटीत पकडतात! असे लोकशाही मूल्यांवर अपार निष्ठा असणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे, फॅसिझम विरोधात स्पष्ट भूमिका घेणारे विद्रोही कवी संपत सरल 18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत

Advertisement


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!