जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी एन आर एम यूचे धरणे आंदोलन
मनमाड(प्रतिनिधी);- ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन नवी दिल्ली काॅ.शिवगोपाल मिश्रा यांनी रेल्वे कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जेथे रेल्वे कर्मचारी आहे अशा प्रत्येक युनिट वर चार दिवस साकळी उपोषण करण्याचा आदेश दिला.त्याचाच एक भाग म्हणून नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मध्य रेल्वे/ कोकण रेल्वेचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड येथे ओपन लाईन शाखे चे सचिव कॉम्रेड अंबादास निकम व कारखाना शाखा चे सचिव रमेश केदारे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे पोलिस स्टेशन जवळ ८जानेवारी ते ११जानेवरी या चार दिवस साखळी उपोषण करण्यात आले.११जानेवारीला सायंकाळी मुख्य कारखाना प्रबंधक श्री मयंक सिंह साहेबांना मेमोरंडम देण्यात आले. विराट सभेने उपोषण ची सांगता करण्यात आली.या सभेला कॉ.अंबादास निकम,कॉ.रमेश केदारे,कॉ.प्रविण बागुल,कॉ.शबरीस नायर,आदी चे भाषणे झाली.यावेळी सुत्रसंचलन कॉ. भारत साळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन कॉ.चंद्रशेखर दखने यांनी केले.यावेळी कॉ.किरण वनीस, नितिन पगारे, अशपाक खान,संदिप अहिरे,विजय जगताप,मनोज गाजरे, बाळासाहेब पवार, रविंद्र चौधरी,हेमंत डोंगरे,सुनिल तागडे, विजय गायकवाड, अस्लम बेग,आनंद भारस्कर ,अविनाश गायकवाड, निलेश पारधे,तेजस बोडके,पंकज अहिरे,प्रकाश कातकडे,दिपक मेमाणे,निलेश इसमपल्ली,अभिषेक कांगणे, नितिन दराडे,मुनव्वर पठाण, ईमरान शेख आदि असंख्य कॉम्रेड तसेच महिला कर्मचारी उपस्थित होते.