नांदगावच्या नाग्यासाक्या धरणांतून सर्रास पाणी चोरी…? सबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष…?


मनमाड(अनिल धामणे) :-सद्या नांदगाव तालुक्याला भीषण पाणी टंचाई भेडसावत असतांना ज्या नाग्या साक्या धरणावर तालुक्याची भिस्त आहे त्याच धरणातून सद्या जलसंपदा विभाग व महावितरण विभागाच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरू असून दुष्काळी भागाला सध्या मृत साठयातुन पाणी पुरवठा केला जात आहे आज ही परिस्थिती आहे तर भविष्यात उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
             यावर्षी अत्यल्प पडलेला पाऊस यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील 8 मंडळापैकी 5 मंडळ दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा करण्यात आली.त्यानुसार उपाययोजना सुरू करण्यात आल्या मात्र याचा अद्यापही लाभ जनतेला मिळाला नाही हा भाग गौण आहे तालुक्यातील अनेक गावांत पाड्यावर सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे यासाठी नाग्या साक्या धरणातील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे मात्र नाग्या साक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मृत साठा शिल्लक असुन यातूनच पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र या पाण्यावर सर्वांच्या समोर आणि राजरोसपणे डल्ला मारण्याचे काम सुरू असुन धरणाच्या अनेक भागांतून शेकडो मोटारीने थेट शेतात पाईपलाईन द्वारे पाणी चोरून नेण्यात येत आहे याकडे जलसंपदा विभाग तसेच महावितरण या दोन्ही कार्यलयाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत असुन याबाबत या विभागाचे प्रमुख अधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांनी मी आताच कार्यभार सांभाळला असुन मी माहिती घेऊन आपणास कळवतो असे सांगितले याचा अर्थ असा की कुंपनचे शेत खात आहे.या धरणाच्या क्षेत्रात शेकडो मोटारी द्वारे थेट पाईपलाईन लावून पाणी उचलले जाते आज जानेवारी महिन्यात या धरणाने तळ गाठला आहे भविष्यात उन्हाळा येईल तेव्हा काय करायचे असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.ही पाणी चोरी कुणाच्या आशिर्वादाने चालते याकडे लक्ष देण्याची गरज असुन सबंधित विभागाने तात्काळ याबाबत चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करून शासन करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने कारवाई करावी…!
– दुष्काळी भाग असतांना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे त्यात जलसंपदा विभाग यासह महावितरण देखील सहभागी आहे का…? कारण विजेच्या मोटारी लावण्यासाठी थेट धरणाच्या आतपर्यंत वीज कनेक्शन नेण्यात आले आहे याकडे कुणाचेही लक्ष कसे नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे तर याबाबत सबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मी आताच चार्ज घेतला आहे माहिती घेतो मग कळवतो असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.याकडे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
दत्तू पवार,सामाजिक कार्यकर्ते
महावितरणचे झोपेचे सोंग…?
नाग्या साक्या धरणांतून जी पाणी चोरी केली जाते या चोरीला जलसंपदा विभाग यासह महावितरण अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत राजरोसपणे धरणांच्या आतपर्यंत मोटार लावल्या जातात यासाठी महावितरण तर्फे कनेक्शन दिले जाते याचा अर्थ काय..? याबाबत माहिती घेतली असता महावितरण व जलसंपदा विभागाच्या आशीर्वादानेच ही पाणी चोरी सुरू असुन महावितरणने झोपेचे सोंग घेतले आहे असाही आरोप सर्वसामान्य जनतेकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!