तुटलेल्या पुलावर पथदीप बसवावे फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचची मागणी…..
मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरातुन जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर असलेला पूल अपघातग्रस्त झालेला आहे या पुलावरून शहारत दक्षीण भागात राहणारे लोक पायी ये जा करतात मात्र रात्रीच्या वेळी शहरातील गुन्हेगारी स्वरूपातील असलेले लोक दारु पिऊन या रस्त्याने येणाऱ्या लोकांवर हल्ला करून त्यांना लूटत आहेत याच्या दोन ते तीन घटना शहरात घडल्या आहेत भविष्यात एखाद्या महिलेची इज्जत लुटल्या जाऊ शकते किंवा एखादीअप्रिय घटना घडू शकते यामुळे मनमाड नगर परिषदेच्या वतीने या पायी जाण्या येण्याच्या रस्त्यावर त्वरित पथदीप बसवावे तसेच मनमाड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच च्या वतीने पालिकेचे अधिकारी अजहर शेख यांच्याकडे करण्यात आली तसेच निवेदन मनमाड शहर पोलिस ठाण्यात देखील निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर अध्यक्ष मिरझा अहमद बेग कार्याध्यक्ष फिरोज शेख,इस्माईल पठाण,अब्बास बेग,गंगादादा त्रिभुवन, अनिल देवरे,माजी नगरसेवक संजय भालेराव,संदीप पवार, शकुर शेख,विलास आहिरे,जावेद मन्सुरी,हाजी शफी मुसा,हाजी अनवर ,हाजी रफिक बाबुजी आदींच्या सह्या आहेत.