ओबीसी तर्फे शालेय साहित्य वाटप करून साजरी केली सावित्रीबाई फुले यांची जयंती.


मनमाड(प्रतिनिधी):- ऑल इंडिया ओबीसी कारखाना शाखा मनमाड तर्फे सावित्रीमाई फुले यांची 193 वी जयंती निमित्य संत बार्णबा विद्यालयातील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .त्यामध्ये एकूण सात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, स्कूल बॅग ,स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले. केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये शिवानी शरद सांगळे महसूल विभागातून MPSC ओबीसी वर्गातून महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या “सब रजिस्टर” पदी निवड झालेल्या शिवानी ताईंनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर ओबीसी तर्फे सब रजिस्टर शिवानी ताई सांगळे यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ,या कार्यक्रमा प्रसंगी कारखान्यातील सर्व महिला व पुरुष कामगार तसेच सर्व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शिवानी ताई शरद सांगळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया ओबीसी कारखाना शाखे च्या वतीने केलेले होते. शालेय साहित्य वाटप करण्यासाठी श्री रामधनी यादव (माजी खजिनदार) ओबीसी मनमाड ,सीनियर सेक्शन इंजिनियर झंकार चौधरी मॅडम, श्री चंद्रकांत भाऊ गायकवाड, श्री पंकज भाऊ मोकड, श्री सुरज भाऊ खैरनार या सर्व मान्यवरांनी शालेय साहित्य वाटपासाठी सढळ हाताने मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया ओबीसी कारखाना शाखेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी मेहनत घेतली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!