नांदगावला चिमुकल्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला शिवराज्याभिषेक सोहळा
नांदगावला चिमुकल्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला शिवराज्याभिषेक सोहळा
नांदगाव(महेश पेवाल):- अखंड हिंदुस्थानाचे दैवत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नांदगाव येथील शिवकन्या सौ संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चिमुकल्यानी शिवस्फूर्ती मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला वय वर्ष अडीच ते 9 वर्षाच्या चिमुकल्या लेकरांनी आज हा आगळावेगळा सोहळा साजरा केला
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमित्ताने नांदगाव येथील शिवकन्या सौ संगिता सोनवणे यांनी लहान मुलांच्या हस्ते शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्वच्छता केली यानंतर जलाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा करून आरती केली यावेळी वय वर्ष अडीच ते नऊ वर्षे वयाच्या मुलांनी यात सहभाग घेतला होता शिवकण्या संगिता सोनवणे यांची शिवभक्ती सर्वाना परिचित आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही कामात अग्रेसर असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती यासह महाराजांच्या जीवनातील विविध घटना त्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात आज देखील त्यांनी चिमुकल्याच्या हस्ते जलाभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला
लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यची जाणीव व्हावी यासाठी प्रयत्न…!
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या कष्टाची तसेच त्यानी आपल्या स्वराज्याची देखरेख कशी केली त्यांनी लढलेल्या लढाई तसेच त्यांनी केलेल्या विविध कल्याणकारी योजनाची यासह त्यांच्या पराक्रमाची लहानपणापासूनच मुलांना माहिती मिळावी यासाठी माझा प्रयत्न असतो कारण त्यांची शिकवणच भविष्यात तरुणाईला कामी येते या दृष्टीने मी काम करत असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर आहे.
सौ संगिता सोनवणे, शिवकण्या