मनमाड बस स्थानकावर प्रवासी असुरक्षित प्रवाशांची सुरक्षितता राम भरोसे


मनमाड बस स्थानकावर प्रवासी असुरक्षित प्रवाशांची सुरक्षितता राम भरोसे

 
मनमाड (आवेश कुरेशी ):- उत्तर महाराष्ट्राचे तसेच उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणारे मनमाड जंक्शन स्थानक तसेच मनमाड बस स्थानक हे अतिशय व्यस्त ठिकाण म्हणून ओळखले जातात मनमाड शहर मध्यवर्ती बस स्थानक सध्या नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे मात्र या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा तर नाही मात्र येथील प्रवासी तसेच महिला प्रवासी सुरक्षित नसल्याचे अनेकदा समोर आले आहे मनमाड बस स्थानकावर रोज पुरुषांचे पाकीट महिलांचे मंगळसूत्र चोरी होतात मोबाईल चैन स्नॅचिंग पैसे चोरीचे प्रकार सुरू असून या प्रकाराला मनमाड शहर पोलीस देखील हतबल झाले आहे या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडलेले आहेत यामुळे रोज खुलेआम चोरटे ड

ल्ला मारत आहे याबाबत आगार प्रमुख देखील कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलत नसल्याने चोर या गोष्टीचा जास्त फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे मनमाड शहर पोलीस ठाण्यात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ते देखील येथे सुरक्षा देण्यास असमर्थ ठरत आहे यामुळे चोरट्यांचे चांगले भागत आहे

Advertisement
                 मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकापैकी मनमाड जंक्शन हे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे मनमाड शहरातून एसटी बस मार्फत शिर्डी शनिशिंगणापूर नस्तनपुर सप्तशृंगी गड अमळनेर त्रंबकेश्वर यासह इतर धार्मिक स्थळी जाण्यासाठी प्रवाशांची व भाविकांची नेहमी रेलचेल असते याशिवाय या बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने कमी जागेत बस स्थानकाचे कामकाज सुरू आहे यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पर्स दागिने महिलांचे मंगळसूत्र सोन्याच्या चैन मोबाईल यावर डल्ला मारण्याचे काम चोरट्यांकडून सुरू असून याबाबत एक दिवसाआड मनमाड शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होत आहे सर्वात एका 70 वर्षीय महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी या घटनेचा शोध घेण्यासाठी पोलीस व महिलेच्या नातेवाईकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी बस स्थानकात भेट दिली मात्र या ठिकाणी सर्व भोंगळ कारभार सुरू असून येथे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत या ठिकाणी एस टी महामंडळाचा तैनात असलेला शिपाई देखील उपलब्ध राहत नाही मनमाड शहर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील देण्यात येत नाही यामुळे या चोरट्यांचे चांगलेच भागत असून गुन्हा दाखल होऊ नये कोणाचेच काही होत नसल्याने चोरीचे प्रमाणात आणखीन वाढ होत आहे आगार प्रमुख म्हणून कार्यरत असलेले अधिकारी देखील याकडे गांभीर्याने बघत नसल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता राम भरोसे आहे की काय असे म्हणण्याची वेळ मनमाड शहरवासी यांना आली आहे
स्थानिकांच्या मदतीने चोरीच्या घटना…?
मनमाड शहर बस स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये जा करतात यात अनेक प्रवासी ये भाविक असतात याशिवाय अनेक प्रवासी हे शालेय शिक्षण नोकर धंदा व्यवसाय या निमित्ताने रोज अप डाउन करणारे असतात या सगळ्यांची शहानिशा करून रोज बाहेरच्या किंवा जेष्ठ प्रवाशांचे पैसे दागिने चोरण्याचा धडाका या चोरट्यांनी सुरू केला असून हे चोरटे बाहेरचे असले तरी अनेकांच्या मदतीशिवाय ते या चोऱ्या करू शकत नाही असेही दबक्या आवाजात बोलले जात आहे या चोऱ्यांना आळा बसेल का असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!